Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या आठ वर्षांपूर्वी ॲन्जीओप्लास्टी होवूनसुध्दा केवळ ३८ टक्के फुफुस काम करीत होते. यासह उच्च रक्तदाब असलेल्या एका वयोवृध्दाची म्युकरमायकोसिसची येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिगंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी भेट घेवून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

 

जळगाव शहरातील अयोध्यानगरातील एका ७० वर्षिय पुरुष रुग्णाच्या ह्रदयाची काम करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी ८ वर्षापूर्वी ॲन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. तसेच रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचा त्राससुध्दा त्याला जडलेला होता. त्यानंतर रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराची बाधा झाली. उपचारासाठी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ कक्षात उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले.  या रुग्णास महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार मोफत करण्यात आले.  वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची शस्त्रक्रिया आज मंगळवार  १३ जुलै रोजी करण्यात आली. रुग्णाचे फुफुस ३८ टक्केच काम करण्यात असल्यामुळे रुग्णास भूल देणे अतिजोखमीचे होते. या सर्व परिस्थितीत रुग्णाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यास वैद्यकीय पथकाच्या टीमला यश आले. दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बधिरिकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्निल इंकणे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याकामी परिश्रम घेतले. यासह वार्ड इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, जोस्त्ना निंबाळकर, निशा गाढे, कविता राणे, ओटी असिस्टंट जितेंद्र साबळे, किशोर चांगरे, जतीम चांगरे, विजय बागुल, विवेक मराठे आदींनी उपचार करण्याकामी परिश्रम घेतले.  अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सदर वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

 

Exit mobile version