Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

९ शिबिरांमध्ये ९५४ दात्यांचे रक्तदान

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने  तालुक्यातून 9 ठिकाणच्या गणनिहाय  केंद्रांवर सुमारे 954 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा काहीअंशी भरून काढणेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर तालुका शिवसेनेच्या वतीने गणनिहाय रक्तदान शिबीर  31 जुलैरोजी पार पडले . शेकडो रक्तदानासाठी आलेल्यांचे नुकतेच लसीकरण झाल्यामुळे त्यांचे रक्त संकलित करण्यात आले नाही.

 

रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील , जीवराम कोळी, नवनीत पाटील, शिवाजी पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे ,शहरसंघटक वसंत भलभले , नगरसेवक पियुष मोरे , मुकेश वानखेडे , संतोष मराठे , आरिफ आझाद , नुरमोहम्मद खान , युनूस खान , जाफर अली, अफसर खान , शकुर जमदार, सलीम खान , मुशीर मणियार , युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे , पंकज पांडव , सतीश नागरे, नारायण पाटील, अविनाश वाढे, नरेंद्र गावंडे, प्रफुल कोळी, प्रमोद कोळी, दीपक वाघ, सुधीर कुलकर्णी , मोहन बेलदार , सुदीप बावस्कर, भागवत पाटील , मितेश पाटील , संदीप पाटील, ईश्वर पाटील , योगेश पाटील, पंकज कोळी, गोलू मुर्हे , विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले,  गोपाळ सोनवणे, गणेश पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ,पारंबी, वढोदा, चिचखेडा बु., अंतुर्ली , चांगदेव, रुईखेडा, उचंदा, मुक्ताईनगर शहर अशा 9 ठिकाणी गणनिहाय रक्त संकलन करण्यात आले. आमदार  चंद्रकांत पाटील यांनी सकाळी मुक्ताईनगर येथील केंद्रावर रक्तदान केले व रक्तदान करण्याचे आवाहन केले.

 

शकुर जमदार व सलीम खान या शिवसैनिकांनी मुस्लिम समाजात स्वतः फिरून रक्तदाते रक्त संकलन केंद्रापर्यंत आणले. या दोघांच्या कार्याचे सर्वांनाच कौतुक वाटत होते .

 

Exit mobile version