Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

७५ दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात काल कोरोनाचे ६०,४७१ नवीन रुग्ण आढळले   ही ७५ दिवसानंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर २,७२६ रुग्णांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

देशातील  दररोज आढळणाऱ्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र बाधित रूग्णांच्या मृत्यूंच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. मृत्यूंची संख्या कमी होतांना दिसत नाही.

 

१,१७,५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार,  आतापर्यंत देशात २,९५,७०,८८१ बाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी, ३,७७,०३१ जणांचा  मृत्यू झाला आहे. तर २,८२,८०,४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  देशात आता ९,१३,३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात सध्या रिकवरी दर ९५.६४ टक्के आहे.

 

 

गेल्या २४ तासांत  तामिळनाडूत १२,७७२,  त्याखालोखाल महाराष्ट्रात ८,१२९,  केरळमध्ये ७,७१९, कर्नाटकमध्ये ६,८३५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४५४९ रुग्ण आढळले गेल्या २४ तासांत जवळपास ६६ टक्के नवीन रुग्णांची नोंद या पाच राज्यांमधून झाली आहे.

 

गेल्या २४ तासांत भारतामध्ये २,७२६  मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Exit mobile version