Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

४६ लाखांची खंडणी मागितली; भुसावळात तिघे अटकेत

aaropi

भुसावळ प्रतिनिधी । नागपूर येथील प्लॉट विकला म्हणून ४६ लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून एक संशयित फरार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ६०/२०२० भादंवि ३६५, ३८४,३२३,१४३,१४७,५०४,५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी भारत मोतीराम गिरणारे रा.भुसावळ यांच्या वडिलांचा नागपुर येथे तीन गुंठ्यांचा प्लॉट आहे. हा प्लॉट फिर्यादीच्या वडिलांनी नागपूर येथील प्रसन्ना दत्तात्रेय टोकेकर (राहणार नागपुर) यांना विकला असून त्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे. असे असताना फिर्यादी यांचेकडून पैसे उकळण्याच्या हेतूने यातील आरोपी भुर्‍या बारसे याने फिर्यादी यांना फोन करून यातील संशयित संजय आवटे यांच्या ऑफिसवर बोलवले. तेथे फिर्यादी आल्यानंतर भुर्‍या बारसे याने व यातील आणखी एका अनोळखी इसमाने फिर्यादीकडून ४६ लाख रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संजय आवटे याने देखील फिर्यादीस ”४६ लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्यावे लागतील नाहीतर तुझे काय खरे नाही” असे म्हणून त्याने धमकी दिली. त्यांनी फिर्यादीला ५५५ नंबरच्या बोलेरो गाडीतून संजय आवटे यांच्या साकरी फाट्यावर असले फार्म हाउसवर घेऊन गेले तिथे गेल्यावर ही त्या त्या सर्वांनी मिळून मारहाण केली. तसेच फिर्यादीस विहिरीत ढकलून देण्याची धमकी दिली. तसेच तेथे असलेल्या आणखी रशीद नावाचे आरोपी इसमाने व एका अनोळखी इसमाने फिर्यादीस ४६ लाख रुपयांची खंडणी मागुन जीवे मारण्याची धमकी दिली आहेत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी त्याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याना मिळलेल्या गुप्त बातमी वरून खालील आरोपीभुर्‍या बारसे ( रा. वाल्मिकी नगर ) किशोर उर्फ सुधाकर टोके रा. गांधीनगर (संजय आवटे यांच्या गाडीवरील ड्रायव्हर तसेच अनिल किशोर डागोर ( रा.वाल्मीक नगर ) यांना अटक करण्यात आली आहे. तर संजय आवटे फरार झाला आहे. संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. निरीक्षक अनिल मोरे, स.फौ. तस्लिम पठाण, पो.ना. रमण सुरळकर, उमाकांत पाटील,महेश चौधरी, तुषार पाटील,समाधान पाटील, पो.का. विकास सातदिवे,ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली आहे.

Exit mobile version