Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२८७ पैकी २८५ आमदारांनी केले मतदान

मुंबई. लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीत होते. त्यात २८७ आमदारांपैकी मलिक आणि देशमुख हे दोन आमदार वगळता २८५ आमदारांनी मतदान हक्क बजावला असून आता सात उमेदवारापैकी महाविकास कि भाजपचा उमेदवार बाहेर पडणार हे मतमोजणी नंतरच कळणार आहे. या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली असून आज (शुक्रवार) मतदान घेण्यात आले. या ‘घोडेबाजार’ आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी कि काँग्रेसचा ‘सातवा’ उमेदवार पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी नाकारल्याने आघाडीचे दोन मतांचे गणित बिघडले. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मते मिळण्याचा महाविकास आघाडीला अंदाज होता, परंतु ठाकूरांची मते मिळण्यात साशंकता आह़े. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस दिसून आली आहे.
काँग्रेस आणि भाजपकडून आक्षेप
आ. सुधीर मुनगंटीवारांनी मतपत्रिका हातात दिल्याने काँग्रसेचे आमदार अमर राजूकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. तर यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. याबाबात भाजपाने आक्षेप नोंदवला असून हि मते बाद करण्यात यावी अशी मागणीकरण्यात आली आहे.
मतमोजणीला उशीर
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान ४ वाजेला संपले असून मतमोजणी परवानगी आलेली नसल्यामुळे मतमोजणी सुरु झालेली नाही. त्यामुळे मतमोजणीस उशिरामुळे निकाल देखील मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

Exit mobile version