Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२१ दिवसांत कोरोना निर्मुलनाचे काय झाले ?

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था / देशात कोरोनानं पाऊल ठेवल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. २१ दिवसांच्या या लॉकडाउननंतर त्यात वाढ करण्यात आली. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. २१ दिवसांच्या काळात कोरोना नष्ट करू, असं मोदी लॉकडाउनची घोषणा करताना म्हणाले होते. याच आश्वासनावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “अचानक करण्यात आलेला लॉकडाउन कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला,”अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

मोदी सरकारवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ कार्यक्रमातून मोदी सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली आहे. वचन दिलं होत २१ दिवसांत करोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग,” असं म्हणत राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटित क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. सुक्ष्म आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. कोणतीही सूचना न देता लॉकडाउन केलं, तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं. असंघटित क्षेत्राचा मणकाच २१ दिवसात तुटला. काँग्रेसने अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण नाही केलं. सुक्ष्म आणि लघू उद्योग पैशाशिवाय नाही जगणार. सरकारनं काहीच केलं नाही. उलट सरकारनं सर्वात श्रीमंत लोकांचा करोडो रुपयांचा टॅक्स भरला. लॉकडाउन कोरोनावर नव्हे तर गरिबांवर , युवकांच्या भविष्यावर ; मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर , असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल,” असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासियांना केलं.

Exit mobile version