Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२१ टक्के लोकांना आधीच कोरोना संसर्ग !

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटले आहे, असे गुरुवारी सरकारने जाहीर केले.

कोरोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संसर्गाचा प्रभाव आरोग्य क्षेत्रातील २५.७ टक्क्यांमध्ये आढळला असल्याचेही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने १७ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे की, १८ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील २८ हजार ५८९ जणांची पाहणी करण्यात आली त्यापैकी २१.४ टक्के जणांना यापूर्वीच करोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. १० ते १७ वर्षे वयोगटातील २८,५८९ जणांची पाहणी करण्यात आली, त्यापैकी २५.३ टक्के जणांनाही यापूर्वीच करोनाची लागण झाल्याचे आढळले.

Exit mobile version