Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२०२३ पर्यंत राज्यातील प्रत्येक घराला पिण्याचे पाणी

 

जळगाव : प्रतिनिधी । राज्यातील प्रत्येक घराला सन २०२३ पर्यंत पिण्याचे पाणी सार्वजनिक व्यवस्थेमार्फत उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली .

स्वच्छ भारत मिशन सप्ताहांतर्गत मशाल पेटवून या सप्ताहाचे शुभारंभ समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते . यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथही दिली

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की , दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहांचा हा राज्यातील पहिला प्रयोग आहे जिल्ह्यात सन २०१३ – १४ पर्यंत सडे पाच लाख शौचालयांची मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे कुटुंब वाढत असतात तशी आणखी नवीन २३ हजार शौचालयांची मागणी पूर्ण करण्याचे काम चालू आहे यापुढे राज्यात ग्रामपंचायती पिण्याच्या पाण्याच्या नळाचे कनेक्शन देणार आहेत आता आमच्या विभागात उप कार्यकारी अधिकारी पदाची निर्मिती करण्यात आली आहे १५ व्य वित्त आयोगाच्या निधीतून स्वतंत्रपणे या कामांसाठी निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ४ टक्के निधीतून जिल्हा स्तरावर कंत्राटी पद्धतीने आन्हियंत्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत राज्य व केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के निधी या विभागासाठी मिळणार आहे . राज्यातील सीईओंच्या बैठक झाल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरु आहेत राज्यभर आमचे काम आंदोलन समजून वेगात पूर्ण करण्याचे माझे प्रयत्न आहेत कोरोना काळातील मंत्रीच नव्हे तर अधिकारी आणि सरपंचांच्या कामाचीही इतिहासात नोंद होईल आमच्या पाणी आणि स्वच्छतेच्या कामाचीही इतिहासात नोंद व्हावी असा आमचा निर्धार आहे राज्यात एकही गाव पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले .

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आज दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी स्वच्छालय नूतनीकरणाचा भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि. प. अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, जि. प. सदस्य नाना महाजन, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिगोटे, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमीत्त विनोद ढगे यांच्या पथनाट्यचा कार्यक्रम ही यावेळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला असून यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी जिप अध्यक्षांचा यावेळी गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छ भारत मिशन सप्ताहांतर्गत मशाल पेटवून या सप्ताहाचे या वेळी शुभारंभ करण्यात आला.

Exit mobile version