Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ एप्रिलपासून वीज दरात २ टक्के कपात

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । लॉकडाउन आणि वाढत्या इंधन व गॅस दराने हैराण असलेल्या सामान्यांना  दिलासा देत  वीज दरात जवळपास २ टक्के कपात करण्याचे आदेश नियामक आयोगाने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. ही दर कपात १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे.

 

राज्य वीज नियामक आयोगानं दर कपातीचा निर्णय घेतला असून, तसे आदेश वीज वितरण कंपन्यांना दिले आहेत. वीज नियामक आयोगानं इंधन समायोजन कर  फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज कंपन्यांना दिले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदाणी या वीज कंपन्यांच्या वीज दरात सरासरी २ टक्क्यांची केली जाणार आहे.

 

राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील वीजदरही निश्चित केले आहेत.  महावितरणच्या घरगुती वीजबिलात १ टक्के कपात केली आहे. त्यामुळे युनिटमागे ग्राहकांना ७.५८रुपये द्यावे लागणार आहे. अदाणी कंपनीची वीज घेणाऱ्या ग्राहकांना ०.३ टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक युनिटसाठी ग्राहकांना ६.५३ रुपये मोजावे लागणार आहे. बेस्टच्या ग्राहकांना ०.१ टक्के वाढीनुसार युनिटमागे ६.४२ रुपये द्यावे लागणार आहे. टाटा पॉवरच्या वीजदरात १ एप्रिलपासून ४.३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. आयोगाने दरवाढीला मंजुरी दिली असून, ‘टाटा’च्या ग्राहकांना प्रति युनिट ५.२२ रुपयांची अधिकची झळ बसणार आहे.

Exit mobile version