Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास महागणार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणं 1 एप्रिलपासून महागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल दरात 5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. मासिक पासच्या किंमतीही 10 ते 20 रुपयांनी वाढू शकतात.

 

एनएचएआय प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्स वाढवते. FASTag च्या टोल टॅक्समध्ये वाढ केल्याने सर्वसामान्यांपासून ते ट्रांसपोर्टर्सपर्यंत सर्वांना याचा फटका बसणार आहे.

NHAI गोरखपूर झोन प्रकल्प संचालक सीएम द्विवेदी म्हणाले की, “टोल टॅक्स प्रत्येक आर्थिक वर्षात वाढतो. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार असून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.”

 

 

FASTag इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली टोल प्लाझावरील प्रतीक्षा कालावधी (वेटिंग टाईम) कमी करते, असा दावा केला जात आहे. यामुळे इंधनाचा वापर कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, राष्ट्रीय महारामार्गांवरुन धावणाऱ्या सर्व वाहनांनी FASTag चा वापर सुरु केला तर दरवर्षी भारतात पेट्रोल आणि डिझेलवर 20,000 कोटी रुपयांची बचत होईल.

 

देशात 16 फेब्रुवारीपासून FASTag सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर टोल वसुलीत प्रचंड वाढ झाली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, फास्टॅगमुळे टोल वसुली 104 कोटींवर गेली आहे.

 

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

 

गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या कलरची असेल तर तुम्हाला फास्ट टॅग बसवावाच  लागेल. जर तुमच्या गाडीला फास्ट टॅग नसेल तर तुम्ही टोला प्लाझा क्रॉस करु शकत नाही. तसंच जर पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल तर ट्रक असो वा कॅब तुम्हाला Fastag बसवावाच लागेल. दुचाकींना मात्र फास्ट टॅगची काहीही गरज नसेल.

 

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

 

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

Exit mobile version