Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१८ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोरोना लस

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यास सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल असे पंतप्रधान मोदींनी  म्हटले आहे .

 

कोरोना व्हायरस अजूनही आहे आणि त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला अधिक काळजीपूर्वक आणखी तयारी करावी लागेल या उद्दीष्टाने आज एक लाख फ्रंटलाइन वॉरियर्सनी तयार करण्याची मोहीम आजपासून सुरू होत आहे. २१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -१९ फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी उपस्थित होते.

 

देशभरातील एक लाखांहून अधिक कोव्हिड वॉरियर्सनी कौशल्यपूर्ण बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. कोविड योद्धांना होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजन्सी केअर सपोर्ट नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय कौशल विकास योजना ३.० अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

 

यावेळी, “२१ जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला लोकांना मोफत लस देण्याचे सरकार वचनबद्ध आहे, दुसर्‍या लाटेमध्ये  विषाणूचे वारंवार बदलणाऱ्या रुपामुळे कोणती आव्हाने येऊ शकतात हे आपण पाहिले आहे. हा विषाणू अजूनही आपल्या आजूबाजूला आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक उपचार पद्धती आणि प्रत्येक शक्यतांसह आपल्याला आपली तयारी अधिक वाढवावी लागेल. या साथीने वारंवार जगाची, प्रत्येक देशाची, संस्थाची, समाजाची, कुटूंबातील माणसांच्या मर्यादांची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे आता ४५ वर्षावरीस पुढील वयोगटाप्रमाणे १८ वर्षावरील नागरिकांना देखील मोफत लस मिळणार आहे,” असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

Exit mobile version