Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१५ दिवसांमध्ये महामार्गावरील खड्डे बुजा- खा. उन्मेष पाटील यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून जाणार्‍या महमार्गांवरील खड्डे १५ दिवसांच्या बुजण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या. ते सनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलत होते.

जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी महामार्गाच्या दयनीय अवस्थेबद्दल आक्रमक भूमिका घेतली. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. तर जळगाव-चाळीसगाव सिमेंट रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामाची पहूरपर्यंतची वर्क ऑर्डर शीत कंन्स्ट्रक्शनला देण्यात आलेली असून काम सुरु झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औरंगाबादच्या वर्षा अहिरे यांनी सांगितले. या मार्गावरील खड्डे १५ दिवसांच्या आत भरा, औरंगाबादप्रमाणे जळगाव हद्दीतील रस्त्याचे दुतर्फा खोदकाम करुन काम करु नका. एकाच बाजूला खोदून दुसर्‍या बाजूने काम करण्याच्याही सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी दिल्या.

Exit mobile version