Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१३ कोटींच्या वसुलीसाठी महापालिकेचे बँक खाते गोठवले ?

 

जळगाव, प्रतिनिधी । महसूल विभागाची महापालिकेकडे जवळपास १३-१४ कोटींची थकबाकी असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश बँकांना उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिले आहेत.

महसूल विभागाने मार्च एंडची कारवाई करत विविध अस्थापानाकडे थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. यात ज्या अस्थापानाकडे थकबाकी आहे अशा अस्थापानाचे बँक खाती गोठविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिले आहेत. यातच महापालिकेकडे जवळपास १३ ते १४ कोटींची महसूलची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी महापालिकेची बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्याशी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज ने संपर्क साधला असत त्यांनी वृत्तास दुजोरा दिला असून खाते गोठविण्यात आले की नाही हे बँकेने अद्याप कळविले नसल्याचे सांगितले. 

Exit mobile version