Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१२ सप्टेबरपासून पिंप्राळा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या ६२ वर्षांपासून सुरु असलेले पिंप्राळा रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद झाले असून आता आपली नेहमीची वहिवाट सोडून आता पर्यायी मार्ग म्हणून शिवाजीनगर उड्डाणपूल आणि बजरंग पुलाखालील रस्ता तसचं राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागणार आहे. तर आता मालधक्क्यावरील संपूर्ण वाहतूक ही रिंगरोडवरून होणार नसल्यानं रिंग रोडवासीयांना धूळ आणि ध्वनी प्रदूषणाच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे.

परिसरातील नागरिक येण्या जाण्यासाठी सोईस्कर असलेल्या पिंप्राळा रेल्वे गेट मार्गाने आता प्रवास करता येणार नसून या संदर्भात मध्य रेल्वे मंडळ, भुसावळने देखील जाहीर सूचना देऊन पिंपळा रेल्वे गेट येथील रेल्वे फाटक क्रमांक १४७ हे रेल्वे प्रशासनातर्फे आजपासून उड्डाणपुलाच्या बांधकामाकरता नागरिकांच्या वापरासाठी कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याची जाहीर सूचना दिली आहे.

भोईटेनगर आणि प्रेमनगरवासीयांसह परिसरातील नागरिक येण्या जाण्यासाठी सोईस्कर असलेल्या पिंप्राळा रेल्वे गेट मार्गाने आता प्रवास करता येणार नसून आज सोमवार, दि. १२ सप्टेंबरपासून पिंप्राळा रेल्वे गेट वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे मंडळ, भुसावळने देखील जाहीर सूचना देऊन पिंपळा रेल्वे गेट येथील रेल्वे फाटक क्रमांक १४७ हे रेल्वे प्रशासनातर्फे आजपासून उड्डाणपुलाच्या बांधकामाकरता नागरिकांच्या वापरासाठी कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याची जाहीर सूचना दिली आहे.

त्यामुळे गेल्या ६२ वर्षांपासून जे नागरिक या मार्गाचा अवलंब करत होते त्यांना आपली नेहमीची वहिवाट सोडून आता पर्यायी मार्ग म्हणून शिवाजीनगर उड्डाणपूल आणि बजरंग पुलाखालील रस्ता तसचं राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागणार आहे. रेल्वेगेट पलीकडे जाणाऱ्या अनेक परिसरात जाण्यासाठी १९६० मध्ये सुरु करण्यात आलेल्या या पिंप्राळा रेल्वे सुरु करण्यात आले होते. गेटमधून जाणार्‍या व येणार्‍या गाड्यांची संख्या मोठी असल्याने दिवसात अनेक वेळा हे रेल्वे गेट बंद राहत होते. रेल्वे प्रशासनाने देशभरातील रेल्वे गेट बंद करून येथे उड्डाण पूल वा भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जळगावातसुद्धा पिंप्राळा, आसोदा आणि रेल्वे गेटलगत उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान मालधक्क्यावरील संपूर्ण वाहतूक ही रिंग रोडवरून होत होती मात्र आता मालधक्क्यावरील मालाची वाहतूक निमखेडीकडे जाणाऱ्या जुन्या महामार्गाच्या रस्त्याकडून गुजराल पेट्रोल पंपाकडे होणार आहे. यामुळे रिंग रोडवासीयांना उड्डाण पूल तयार होत नाही तोपर्यंत धूळ आणि ध्वनी प्रदूषणाच्या त्रासापासून सुटका होणार आहे. तर प्रेमनगर आणि भोईटे नगर परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी शिवाजीनगर उड्डाणपूल आणि बजरंग पुलाखालील रस्ता तसचं राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

 

Exit mobile version