Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१० लाखांसाठी विवाहितेचा छळ

 

जळगाव प्रतिनिधी । जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी नांदूरा ( जि. बुलढाणा ) येथील  पतीसह  ८ जणांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील शाहूनगर येथील माहेर असलेल्या गुलनाजबी अब्दुल वसीम यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील अब्दुल वसीम शेख अजीज यांच्याशी झाला. लग्नानंतरचे सुरुवातीचे दीड महिना चांगला गेला . त्यानंतर पती अब्दुल वासीम यांनी घर बांधण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन यावे असे  विवाहितेला सांगितले. मात्र १० लाख रूपये  देवू शकत नाही त्यावरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. याला पाठबळ म्हणून सासरे शेख अजीज शेख सत्तार, शेख इम्तियाज शेख अजीज, यास्मिनबी फिरोज खान, शाहिस्ताबी नईम पठाण, शेख हकीम शेख अजीज, शेख जुनेद शेख अजीज, शेख अजीम शेख अजीज ( सर्व रा.वडनेर भोलजी ता. नांदुरा जि. बुलढाणा ) यांनी देखील टोमणे मारून गांजपाठ केला. हा प्रकार असह्य झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार संगीता खांडरे करीत आहे.

Exit mobile version