Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरचे एसडीएम कोरोनाबाबत जनजागृती तर त्यांची पत्नी रुग्णसेवेत व्यस्त

 

रावेर, प्रतिनिधी । कोरोना सारखा जिवघेणा वायरस फैजपुर प्रांतात येऊ नये जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले सकाळी आठ वाजल्यापासुन आपल्या सहकार्यांना सोबत घेत गावो-गावी फिरून लोकांना घरात राहण्याचा सल्ला देतात, तर कुठे प्रांत स्वतः च माइक हातात घेऊन जनतेत कोरोनाबाबत जन-जागृती करतांना दिसतात. त्यांच्या पत्नी डॉक्टर असून, त्या देखिल कोरोनाच्या संकटकालात रुग्णसेवेची खिंड लढवत आहेत.   तर त्यांचे कर्तव्यदक्ष पती जनसेवा व कोरोना विरुध्द लढण्यासाठी दररोज यावल-रावेर भागात शंभर किमी फिरल्या शिवाय, जनतेला सुरक्षित घरात बघितल्याशिवाय फैजपुरला आपल्या घरी परत नाही

कोरोनाचे संकट दिवसें-दिवस वाढत असून हे येणारे परकीय संकट परतुन लावण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिका-यांनी चांगली कंबर कसली आहे. कोणी मुलांना सोडून सेवा देताय तर कोणी दुसऱ्यांच्या मुलांसाठी, वृध्द आई- वडिलांसाठी सेवा देतात. अशीच सेवा देणारे फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले सध्या त्यांच्या कामांमुळे चांगलेच चर्चेत आहे. डॉ सुप्रिया थोरबोले यांचे कर्तव्यदक्ष पती तथा प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले दोघे ही डॉक्टर असल्याने त्यांना आलेल्या कोरोनाचे संकट चांगले ठाऊक आहे. म्हणून डॉ सुप्रिया थोरबोले या प्राथमिक आरोग्य केंद्र, पाडळसे (ता. यावल)येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्ण सेवा देऊन कोरोनाविरुध्द खिंड लढवत आहेत. प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले रावेर -यावल येथील नागरीकांच्या सुरक्षेच्या मोहिमेवर निघतात. यामध्ये नागरीकांच्या आरोग्याची सुरक्षितता व त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्न-धान्य पुरवण्याची व्यवस्था करणे, एनजीओमार्फत किराण्याचे किट तयार करून त्याचे वाटप करणे. रावेर, सावदा, फैजपुर,यावल येथे कोरोनासंदर्भात खबरदारी म्हणून अनेक शाळा, हॉस्पीटल, अधिग्रहीत करून येणाऱ्या पेशंटवर उपचाराची व्यवस्था ही सर्व कामे त्यांच्या आदेशावरुन करण्यात येत आहे. आज दिवसभर सुध्दा त्यांनी रावेर तहसिलला बैठक, शहरातील विविध ठिकाणी भेटी, वाघोड आरोग्य केंद्राची पाहणी, वाघोड जि. प. शाळेतील विलगीकरण केंद्राची पाहणी, चोरवड आतंरराज्य सिमेची दिवसभर पाहणी करून मग सायंकाळीच प्रांतधिकारी फैजपुर येथे आपल्या मुख्यालयी परत येतात. डॉ अजित थोरबोले सांगतात की, कोरोना आल्यापासुन व लॉकडाउन झाल्यापासुन आधी धान्य वाटप, नंतर कोरोना संदर्भात सुरक्षितता, मग विलगीकरण कक्ष आणि आता पुढचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेश- महाराष्ट्र सिमेची सुरक्षा महत्वाचे आहे. नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन ते करतात. त्यांची कोरोना विरुध्द लढण्याची जिद्द , धैर्य बघता आतापर्यंत फैजपुर प्रांत विभागात एकही कोरोना पा‌ॅझीटिव्ह रुग्ण आढळला नाही याचे मोठे समाधान प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना आहेत.

Exit mobile version