Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फ़ैजपूर येथे सार्वजनिक रामनवमी उत्सव समितीतर्फे गरजुंना मोफत जेवण

फैजपूर, प्रतिनिधी । गावातील मंदिरातच पुजाऱ्यांनी साजरी केली रामनवमी तसेच फैजपूरातील सार्वजानिक रामनवमी उत्सव समितीने गावातील हातावर पोटभरणारे कुटुंबना दिले गुरुवारी सकाळी व संध्याकाळी जेवण दिले.

कोरोनामुळे नागरिकानी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, तोंडाला मास्क लावा असा सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असा शासनाचा आदेश आहे. गावातील मंदिरे सुद्धा बंद आहेत. गुरुवारी भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस दुपारी १२ वाजता फैजपूर गावातील मंदिरात पुजाऱ्यांनी मंदिरातच गर्दी न करता रामनवमी साजरी केली. गावातील सार्वजनिक रामनवमी साजरी करण्याऱ्या समितीने गावातील हातावर पोट भरणारे कुटुंब, बाहेरगावी पायदळ जाणारे येणारे कुटुंब, मरी माता मंदिर जवळीक कुटुंब, रवी कोळी यांचे ग्यारेज समोरील कुटुंब, मनोहर पाटील यांचे शेतात, गुरुदेव कॉम्प्लेक्स समोरील, छत्री चौकातील, गावातील गरजू कुटुंब यांना सकाळ व संध्याकाळी गुरुवारी रामनवमी या दिवशी अन्नदान करून प्रभू रामचंद्र यांच्या विचारांनी गरिबांना अन्नदान करून साजरी केली. अन्नदान कार्यक्रमासाठी निरज झोपे, सोनू ठाकरे, रितेश चौधरी, लोकेश कोल्हे, प्रतीक वारके यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version