Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

होय. . .पत्रकार वारिशेंचा जाणीवर्पूक अपघात घडविला : राज्य सरकारची कबुली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्रकार शशिकांत वारिशे यांचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला असल्याची कबुली आज राज्य सरकारने दिली आहे.

 

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीचे गठन देखील करण्यात आलेले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानपरिषदेत प्रश्‍न विचारण्यात आला. यावर राज्य सरकारतर्फे हा अपघात जाणवपूर्वक घडविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

 

शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबरेकर याला अटक करण्यात आलेली असून लवकरच हे प्रकरण न्यायालयात दाखल होणार असल्याची माहिती मिळालेली आहे.

Exit mobile version