Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

होय आपण जिंकणारच ! : जिल्ह्यात आज ९५ रूग्ण कोरोना मुक्त

जळगाव प्रतिनिधी । दररोज कोरोनाचे रूग्ण वाढत असतांना जिल्ह्यात बरे होणारेही वाढत असून आज तब्बल ९५ रूणांनी कोरोनावर विजय मिळवल्याने त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात आज ७६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. मात्र अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणार्‍यंच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यात आज एकाच दिवशी जिल्ह्यातील ९५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत तब्बल ८६५ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात करून ते घरी परतले आहेत. तर सध्या ८०३ रूग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजवर १४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

सध्या उपचार सुरू असणार्‍या बहुतांश रूग्णांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याने कोरोनामुक्त होणार्‍या पेशंटची संख्या लवकरच वाढणार असल्याचे आता दिसून येत आहे. यामुळे आपण कोरोना विरूध्दची लढाई जिंकणार असल्याचा विश्‍वास निर्माण झाला आहे.

Exit mobile version