Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेल माथेरान मित्रमंडळातर्फे गरजूंना अन्नदान

चांदवड, उदय वायकोळे । राष्ट्रीय महामार्गावरून आपापल्या गावी जाणार्‍या परप्रांतीयांना येथील हॉटेल माथेरान मित्रमंडळातर्फे अन्नदान करण्यात येत आहे.

सध्या मुंबई व नाशिकहून हजारो परप्रांतीय आपापल्या घरी पायी वा सायकलवरून निघाले आहेत. शेकडो किलोमीटर पायपीट करून घराच्या ओढीने निघालेल्या या लोकांची खाण्याची व्यवस्था देखील नाही. या पार्श्‍वभूमिवर, चांदवड येथील हॉटेल माथेरान मित्र मंडळातर्फे या लोकांना दररोज अन्नदान केले जात आहे. या लोकांना पोटभर अन्न दिले जात असून यासोबत थंडगार पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. यासाठी मंडळाचे पदाधिकारी गणेश भापकर, निलेश काळे, सचिन अग्रवाल, मनोज जाधव, पिंटू शिंदे, वैभव निकम आदींचे सहकार्य लाभत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version