हॉटेल प्रेसिडेन्टच्या पार्किंगमधून बँक कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

 

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील हॉटेल प्रेसिडेन्ट कॉटेज या हॉटेलमध्ये उभी केलेली बँक कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवराम नगर येथे विमल गौतमचंद जैन वय ४० हे वास्तव्यास आहेत, ते एचडीएफसी बँकेत नोकरीला आहेत. ९ नोव्हेंबर रोजी बॅकेच्या कामानिमित्ताने पाचोरा व चाळीसगाव येथे जावयाचे असल्याने विमल जैन यांनी त्यांची एम.एच19 बी वाय 4797 या क्रमाकांची दुचाकी हॉटेल प्रेसिडेन्टच्या पार्किंकमध्ये उभी केली. रात्री साडेअकरा वाजता काम आटोपून परतले असता, हॉटेलमध्ये पार्किंक केलेली दुचाकी दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने विमल जैन यांनी दोन दिवसानंतर आज शुक्रवारी सकाळी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे

Protected Content