Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेल गौरव जवळील समर्थ ऑटो केअर दुकानाला आग

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुसावळ रोडवरील हॉटेल गौरवच्या बाजूला असलेल्या समर्थ ऑटो केअर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगेत ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आनंदा गव्हाळे (वय-२९) रा.कुसुंबा ता. जिल्हा जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव भुसावळ रोडवर असलेल्या हॉटेल गौरवच्या बाजूला समर्थ ऑटो केअर दुकान आहे. दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ३० सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास दुकानातील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या बमने ही आग विझवण्यात आली.

याप्रकरणी मनोज गव्हाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.

Exit mobile version