Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेल कारागिराची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या गेट जवळून हॉटेल कारागिराची दुचाकी लांबविल्याप्रकरणी सोमवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील कांचन नगर भागातील प्रशांत चौकात पुंडलिक भीमराव माळी वय ३० हे  वास्तव्यास आहे. ते साई दर्शन हॉटेल येथे कारागीर म्हणून कामाला आहे. पुंडलिक माळी हे रविवार 2 एप्रिल रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल परिसरात आले होते यादरम्यान त्यांनी त्यांची एम एच 19 डी एच २२९४ या क्रमांकाची दुचाकी प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटलच्या गेट जवळ उभी केली. काम आटोपून पाहून तासात दहा वाजेच्या सुमारास परतले असता त्यांना उभी केलेली दुचाकी दिसून आले नाही परिसरात इतरत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी तीन एप्रिल रोजी दुपारी पुंडलिक माळी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून 25 हजार रुपयांची दुचाकी लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वंदना राठोड ह्या करीत आहेत.

Exit mobile version