Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉटेलांना किचन सुरु ठेवण्यास परवानगी ; उपमुख्यमंत्री पवार

मुंबई, वृत्तसेवा । राज्यातील हॉटेलांना किचन सुरु ठेवण्यास व खाद्यपदार्थ घरपोच पोहोचविण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘करोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही ‘करोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळं होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असंही पवार यांनी सांगितलं.

Exit mobile version