Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हुतात्मा सुनील काळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सोलापूर । दहशतवाद्यांविरोधात लढताना वीर मरण आलेले सीआरपीएफ जवान सुनील काळे यांच्या पार्थिवावर शासकीय आणि लष्करी इतमामात पानगाव या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक झाली होते. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेहोते. मात्र येथे दशहतवाद्यांविरोधात लढत असताना महाराष्ट्राचे सुपूत्र सुनील काळे यांना वीरमरण आले. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. काळे गेल्या १७ वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दालत काम करत होते. नुकतेच त्यांना हेड काँस्टेबल या पदावर बढती मिळाली होती. दोन भाऊ आणि एका बहीणीत ते मधले बंधू होते. दरम्यान, आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. शोकाकूल वातावरणात शहीद काळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Exit mobile version