Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ही तर आव्हाडांची नौटंकी, हिंमत असेल तर खरंच राजीनामा द्या : भाजप

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जितेंद्र आव्हाड हे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नौटंकी करत असून हिंमत असेल तर त्यांनी खरोखर राजीनामा द्यावा अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून आपल्या पदाचा राजीनामा हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी सडकून टीका केली.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पत्रकार परिषदेत म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळीच राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलंय.  मात्र आव्हाड हे नौटंकी करत आहेत. ह्मिंत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Exit mobile version