हिरोशी शैय्यासोबत केल्यावरच ……

मुंबई वृत्तसंस्था । समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी बॉलिवूडची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला. जया बच्चन यांनी सरकारकडं हिंदी सिनेसृष्टीच्या मागं उभं राहण्याची विनंती केली. ‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ असं म्हणत भाजप खासदार रवि किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या वादात आता कंगना राणावत हिनं देखील उडी घेतली असून तिनं जया बच्चन यांच्यावर निशाणा साधात आणखी एक ट्विट केलं आहे.

कंगनानं जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीनं कुठली थाळी दिलीए,(जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीनं काय काम दिलंय.) एक थाळी मिळत होती.(एक काम मिळत होतं). ज्यामध्ये दोन मिनिटांचं आयटम नंबर आणि एक रोमॅंन्टीक सीन मिळत होता. तो देखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवाद शिकवलाय. माझी थाली स्वत: देशभक्ती आणइ महिलाप्रधान चित्रपटांनी सजवलीए. त्यामुळं ही माझी थाळी आहे, जयाजी तुमची नाही’, असं आणखी एक वादग्रस्त ट्विट कंगनानं केलं आहे.

Protected Content