Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिरेन यांच्या बेपत्ता वाहनाचा तपास थांबवण्याची वाझे यांची पोलिसांना सूचना

 

मुंबई : वृत्तसंस्था । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी   सचिन वाझे यांनी विक्रोळी पोलिसांना फोन करुन मनसुख हिरेन यांच्या बेपत्ता वाहनाचा शोध थांबवा असं सांगितलं होतं

 

१८ फेब्रुवारी मनसुख हिरेन यांनी कार चोरी झाल्याची तक्रार दिली होती.

 

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी नरिमन पॉईंटमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (DVR) ताब्यात घेतला आहे. सीसीटीव्हीत सचिन वाझे दोन बॅग हातात घेऊन चालताना दिसत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सचिन वाझे ओळख लपवत बनावट कागदपत्रांच्या आधारे हॉटेलमध्ये राहत होते असा एएनआयला संशय आहे.

 

सचिन वाझे यांनी १८ फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करुन मनसुख हिरेन यांनी दाखल केलेल्या स्कॉर्पिओ चोरी तक्रारीचा तपास थांबवण्यात सांगितलं होतं. अँटिलियाजवळ स्कॉर्पिओ सापडल्याच्या दोन दिवसांनी सचिन वाझे यांनी हा फोन केला होता.

 

“सचिन वाझे यांना पुरावे नष्ट करायचे असल्याने त्यांनी  तपास क्राइम ब्रांचकडे वर्ग केल्याचं दिसत आहे. त्यांना पोलिसांन तपास करण्यापासून रोखायचं होतं. त्यांनी विक्रोळी पोलिसांना फोन करुन यामध्ये आपला सहभाग समोर येऊ नये याची काळजी घेतली,” असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सचिन वाझे यांनी फोन केल्यानंतर विक्रोळी पोलिसांनी तपास थांबवला कारण हे प्रकरण क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आलं.

 

एनआयए सध्या सचिन वाझे हॉटेलमध्ये असताना कोणाला भेटले तसंच पैशांचा व्यवहार कोणत्या पद्धतीने झाला याची माहिती घेत आहे. एनआयए अधिकाऱ्यांनुसार, सचिन वाझे यांनी बनावट आधार कार्ड वापरलं ज्यावर त्यांचा फोटो होता. वाझे यांनी हॉटेलमध्ये सादर केलेली आधार कार्डची झेरॉक्स एनआयएने ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

Exit mobile version