Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे — पायल रोहतगी

 

 

यावल, प्रतिनिधी । चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमातून हिंदुद्वेष पसरवण्याचे जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले गेले आहे. केंद्र सरकारने बहुसंख्यांकांच्या धर्मभावनांची दखल घेऊन सामाजिक सलोख्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्यासारख्या कठोर कायदा करावा, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेत्री पायल रोहतगी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. यू-ट्यूब, फेसबूक आणि ट्वीटर या माध्यमांतून प्रसारित झालेला हा कार्यक्रम ५७ हजारांहून अधिक जणांनी पाहिला.

यावेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमांतून हिंदुद्वेष पसरवणे, हा एक प्रकारचा बौद्धिक आतंकवाद आहे आणि हिंदु त्याला बळी पडत आहेत. अन्य धर्मियांनी आक्षेप घेतल्यावर ‘सॅटनिक व्हर्सेस’ ही कादंबरी आणि ‘द दा विंची कोड’ यांसारख्या चित्रपटांवर लगेच प्रतिबंध घातला जातो; पण हिंदूंनी आक्षेप घेतल्यावर अशी कारवाई होत नाही. चित्रपटाला मान्यता देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे; पण त्याचे सदस्य कशाच्या आधारावर चित्रपटांना मान्यता देतात, हा प्रश्‍न उपस्थित केला. हिंदु आय.टी. सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी देवतांच्या विटंबनेच्या विरोधात तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस टाळाटाळ करत असल्याचा अनुभव कथन केला. याविषयी हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सुधारा; अन्यथा आम्ही तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या सुधारू, अशी चेतावणी त्यांनी हिंदुविरोधकांना दिली. ईश्‍वरनिंदा विरोधी कायद्याच्या मागणीसाठी २३ जानेवारीला सोशल मीडियावर ऑनलाईन आंदोलन करण्यात आले असल्याची माहीती हिन्दु जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिलेल्या माहीतीत सांगीतले आहे.

Exit mobile version