Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फैजपूर येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ संपन्न !

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रशांत जुवेकर यांनी केले.

 

ते फैजपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभ दिव्य मंगल कार्यालयात १६ ऑक्टोबर या दिवशी आयोजित ‘हिंदूसंघटन मेळावा’ प्रसंगी बोलत होते. मेळाव्याला सनातनच्या क्षिप्रा जुवेकर यांनीदेखील संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या या महराष्ट्रातील गड दुर्ग यांची वर्तमान स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक गड दुर्गांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे आणि प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. आपल्या पूर्वजांचा हा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आता आपल्याला जोमाने प्रयत्न करावे लागतील. भूमी बळकवणे, खडणी वसूल करणे’, धर्मांतरण करणे आदी षड्यंत्र राबवणाऱ्या वक्फ बोर्डच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी जळगाव येथे याविरोधात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबरला भव्य आंदोलन उभारणार असून फैजपूर येथे १८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११  वाजता प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक  प्रशांत जुवेकर यांनी केली. मेळाव्याचे सुत्रसंचालन श्री. निखिल कदम यांनी केले.

 

Exit mobile version