Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोलीत बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

हिंगोली (वृत्तसंस्था) दहावीचा भूमितीचा पेपर दिल्यानंतर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह कालव्यात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

दहावीत शिकणारा दीपक नरोटे हा विद्यार्थी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. 12 तारखेला भूमितीचा पेपर देऊन दीपक पोहण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. परंतु आज सकाळी वसमत-परभणी रोडवर असलेल्या कॅनॉलमध्ये दीपकचा मृतदेह आढळून आला. दीपक हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील जयनगर भागात राहत होता. दरम्यान, हा अपघात आहे की, घातपात याबाबत पोलीस तपास करत आहे.

Exit mobile version