हिंगोणा- सावखेडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा उत्साहात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा- हिंगोणा येथे जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून गटात एक कोटी तीन लाख पन्नास हजार रुपयांचे नीधी उपलब्ध झाल्याने मान्यवरांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन सोहळा सोमवारी पार पडला.

यावल तालुक्यातील हिंगोणा- सावखेडा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता अतुल भालेराव यांचे विकास निधीतून सावखेडासीम येथे जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधण्यासाठी 17 लक्ष रुपये ,शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी पाच लक्ष रुपये, अंगणवाडीसाठी 8.5 लक्ष रुपये, मोहराळे ग्रामपंचायत अंतर्गत जामुनझीरा अंगणवाडीसाठी 8.5 लक्ष, पांढरी वस्ती अंगणवाडीसाठी बांधकाम 8.5 लक्ष वड्री येथील शाळेच्या नवीन खोल्या बांधकामासाठी 17 लक्ष, वड्री ईदगाह कॉंक्रिटीकरण तीन लक्ष रुपये, वड्री येथील कॉंक्रिटीकरण व गटार बांधकाम साठी 9 लक्ष रूपये वड्री ते मावळा रस्ता डांबरीकरण पंधरा लक्ष रुपये कोळवद-कोरपावली रस्ता बारा लक्ष असे जिल्हा परिषद गटात विविध गावातील 103.5 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन आज सोमवारी १७ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
सदर भुमिपुजन हे पंचायत समिती सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, हिरालाल चौधरी, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव,भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांचे हस्ते पार पडले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी, डांभुर्णीचे माजी सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी ,कांचन फालक, पंचायत समितीचे सदस्य दीपक अण्णा पाटील, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, देवीदास धांगो पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश वसंत फेगडे ,लहू पाटील, अतुल भालेराव ,लक्ष्मण बडगुजर ,सावखेडा सरपंच बेबाबाई पाटील, मुबारक तडवी ,दिनेश पाटील, भुषण पाटील ,कमलाकर पाटील, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, नथ्थु पाटील, मोहराळे सरपंच नंदा गोपाळ महाजन, उपसरपंच जहागीर तडवी ,संजीव महाराज ,गोपाळ महाजन, अकिल तडवी, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, राजू तडवी ,यशवंत पाटील ,वड्री सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी ,नवाब तडवी, उमाकांत पाटील, ललित चौधरी, सरदार तडवी, फिजा तडवी ,नयना चौधरी, वैशाली चौधरी, आर .के .चौधरी, गोविंदा सुरवाडे, सुनील पाटील व आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content