Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणा येथे नेहरू युवा केंद्रातर्फे स्वच्छता मोहीम

यावल, प्रतिनिधी | भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या वतीने तालुक्यातील हिंगोणा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातुन ७५ किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या वेस्टेज गोळा करून  कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. त्याचबरोबर यावेळी नेहरू युवा केन्द्राच्या वतीने गावकर्‍यांना मार्गदर्शनातून माहीती देवुन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. प्लास्टिकचा वापर कमी करून आपण कशा प्रकारे पर्यावरण रक्षण करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती या वेळी दिली. स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम प्रसंगी हिंगोणा येथिल ग्रामपचायत सरपंच रूख्साना तडवी ,ग्रामविकास अधिकारी देवानंद सोनवणे, ग्रामस्थ निलेश ठाकुर, शांताराम कोळी, प्रभाकर.सोनवणे, राकेश नेमाडे, सूर्यभान तायडे, रामा आदिवाले, राजू आदिवाले, अरमान तडवी, नितीन सावळे, उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समन्वय पल्लवी तायडे, तेजस पाटील, डिंगमबर चौधरी यांनी पाहिले. त्यासबरोबर हिंगोणा येथील पत्रकार शब्बीर खान यांचे सहकार्य लाभले.  याप्रसंगी ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविण्याकरीता उपस्थित असलेल्या सर्वांचे दिगंबर चौधरी यांनी आभार मानले.

Exit mobile version