Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगणघाट येथील पिडीतेचा अखेर मृत्यू; सर्वत्र संतापाची लाट

नागपूर प्रतिनिधी । हिंगणघाट येथे एका माथेफिरून तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रकार अलीकडेच घडला होता. या तरूणीवर नागपूर येथे उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालवली असून यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत वृत्त असे की, विदर्भातील हिंगणघाट येथे काही दिवसांपूर्वी विकेश नगराळे या माथेफिरूने एका तरूणीला भर रस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात ती तरूणी गंभीररित्या भाजली गेली होती. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. तथापि, उपचारा दरम्यान तिची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आज सकाळी त्या तरूणीची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून त्या नाराधमाला फाशी देण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version