हाफ मॅरेथॉन ‘खान्देश रन’ स्पर्धेला उदंड प्रतिसाद ( व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी सागरपार्क येथे रविवारी ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ‘खान्देश रन’ स्पर्धेत जळगावकर रसर्न धावले. खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याहस्ते हिरवी इंडी दाखवून खान्देश रनला सुरूवा करण्यात आली. जिल्ह्यात हाफ मॅरेथॉन प्रकारातील ही पहिलीच स्पर्धा असून २१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी रेस, ५ किमी रेस तसेच ३ किमी रेस अशा ४ प्रकारात तीचे आयोजन करण्यात आले होते.

 

जळगावात रविवारी तिसऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर हे या ‘खान्देश रन’ स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेत विविध वयोगटातील मुले-मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. रन दरम्यान, प्रत्येक स्पर्धकाला रनिंग आणि फिटनेसचे महत्त्व मनोरंजनातून समजविण्यात आले. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करत रनर्सचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधांसह रनर्सला चिअरअप करण्यासाठी खेळाडू, विविध शालेय बँड पथक, लेझीम व ढोल-ताशे पथक देखील वातावरण निर्मितीसाठी आकर्षण ठरले.

 

रन संपल्यानंतर स्पर्धकांना सेल्फी घेता यावेत यासाठी खास सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले होते. याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी स्पर्धकांची मोठी गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे नृत्य, संगीत अशा मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल होती. या वर्षीची ‘खान्देश रन’ ही स्पर्धा २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर रेस, ५ किलोमीटर रेस तसेच ३ किलोमीटर रेस अशा ४ प्रकारात पार पडली.

याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, पोलीस अधिक्षक एस.राजकुमार, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डी.डी.बच्छाव, मनोज आडवाणी, किरण बच्छाव, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

Protected Content