Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हाथेड नाल्यात पुलावरून जाणारे ट्रॅक्टर उलटले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ हाथेड नाल्यात पुलावरून जाणारे एक ट्रॅक्टर उलटल्याची घटना गुरुवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडले या घटनेत ट्रॅक्टर चालक जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद रोड ने एक ट्रॅक्टर जात होते. यादरम्यान चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने फार्मसी महाविद्यालयाजवळ असलेल्या हाथेड नाल्यात पुलावरून ट्रॅक्टर हे खाली कोसळले. या घटनेत ट्रॅक्टर चालक जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर रस्त्यावरील ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळालं. काही नागरिकांनी ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान या घटनेची उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती .

Exit mobile version