Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हाथरस प्रकरण: पिडीतेच्या कुटुंबियांना न्याय द्या; अ.भा. वाल्मिकि महापंचायतीचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आरोपींना पकडून फाशीची शिक्षा द्यावी व पिडीतेला न्याय द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय वाल्मिकि महापंचायतीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालसामोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आरोपींना पकडून फाशीची शिक्षा द्यावी व पिडीतेला न्याय द्यावा यासाठी चारही आरोपींना जलद न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी, पिडीत मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे, पिडीतेच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत करावी आणि घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर गणेश बारसे, एम.टी.पटेल, तसलिम खान, जावेद अहमद, ईसाक चौधरी, निजाम खाना, कंचन बारसे, प्रल्हाद सोनवणे, अशोक चुटीले, सुनिल नकवाल, नरेंद्र नकवाल, संजय वागरे, संतोष दाबोडे, योगिता शुक्ल, छाया कोरडे, अमिना तडवी, प्रमोद वाणी, सुदाम कोरडे, हसन तडवी, सुरज संकत, राहुल नकवाल, लखन सांगिनी, प्रेमचंद बिरावट, राजेश लहाने, अलकाबाई सोनवणे, रविंद्र चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version