Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हातगाडी बाजूला लावण्यावरून चिकन विक्रेत्याला धमकी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वडापावीची गाडी बाजूला लावा असे सांगितल्याच्या कारणावरून चिकन विक्रेत्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशपाक शहा युनूस शहा रा. बागवान गल्ली, भुसावळ हा चिकन विक्रेता असून त्याची शहरातील निकम बिल्डिंग खाली गवळीवाडा येथे चिकन विक्रीचे दुकान आहे. त्याच्या दुकानाच्याबाजूला सावण गणेश अग्रवाल रा. हंबर्डीकर चाळी भुसावळ हा वडापावची गाडी लावतो. बुधवारी १३ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अशपाक शहा यांनी सावण अग्रवाल याला वडापावची गाडी बाजूला लावण्याचे सांगितले. त्यावरून सावण अग्रवाल याने शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबत अशपाक याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सावण अग्रवाल याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version