Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हाडांचा सांगाडा, कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेल्या स्थितीत तसेच हाडांचा सांगाडा असलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

 

जळगाव शहरातील विद्या नगर येथील मनोज हरिश्चंद्र पाटील यांचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात गट नं ६८८ याठिकाणी शेती आहे. मनोज पाटील हे मंगळवार, ९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात गेले होते.  यादरम्यान शेतातील बोरींगजवळ मनोज पाटील यांना एका अनोळखी व्यक्तींचा कुजलेल्या स्थितीत तसेच हांडांचा सांगाडा असलेला मृतदेह आढळून आला. मनोज पाटील यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली, त्यानुसा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. याबाबत बुधवार, १० मे रोजी शेतकरी मनोज पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमका मयत कोण, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सायकर हे करीत आहेत.

Exit mobile version