Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हाडवैद्य डॉ. अवधुत चौधरी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या ७५ वर्षाचा वारसा चालविणारे हाडवैद्य डॉ. अवधुत चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच झालेल्या छोट्याखानी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या वडील नामदेव चौधरी यांच्याकडून वैद्यकीय ज्ञानाचे धडे गिरवणारे, हाडवैद्य म्हणून ७५ वर्षाचा वारसा नेणारे आणि दहीहंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदांवर मोफत उपचार करणारे डॉ. अवधुत चौधरी हे जळगाव जिल्ह्यात हाडवैद्य म्हणून प्रसिध्द आहेत. नुकतेच २ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जुने जळगावातील पांझरपोळ टाकीजवळील साईमंदीरासमोरील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
यावेळी डॉ. अवधुत चौधरी यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष व फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात डॉ. अर्जून भंगाळे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. जितेंद्र कोल्हे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. चेतन कांकरिया, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉक्टर हिवरकर, सामाजिक कार्यकर्ता शुभांगी बिऱ्हाडे, शोभाताई चौधरी, पुष्पा तळेले, प्रकाश सोनवणे, राहुल सूर्यवंशी, बापू पाटील, राजू कोतवाल, भरत खडके, विजू सैतकर, दिलीप फडके, धनराज पाटील, शरद चौधरी (मामा), महेंद्र बोरोले, मयूर भारंबे, शेखर अत्तरदे, अरुण काळे, मोनू सोनार, निलेश गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

हाडवैद्य सेवा देण्याची तिसरी पिढी
समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदा, कबड्डीचे खेळाडू, कुस्ती खेळाडून यांना निशुल्क उपचार करून सेवा देत आहे. डॉ. अवधूत चौधरी यांनी वैद्यकीय ज्ञानाचा वारसा वडील नामवंत हाडवैद्य स्व. नामदेव चौधरी यांच्याकडून घेतला. आता डॉ. अवधूत चौधरी यांचे मुलगा नितेश आणि स्वप्निल ही तिसरी पिढी देखील हाडवैद्यचा वारसा कायम ठेवला आहे.

Exit mobile version