Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचा खर्च केंद्राचा नसल्याचा खुलासा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या वर्षी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात आयोजित ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचा खर्च सरकारने केला नाही. हा संपूर्ण खर्च अमेरिकास्थित ‘टेक्सास इंडिया फोरम इंक’ या संस्थेने केला होता, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली. २२ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत ५० हजार भारतीय-अमेरिकी नागरिकांना संबोधित केले होते.

‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळविण्यास भारताने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे,’ अशीही माहिती मुरलीधरन यांनी दिली. ‘भारताने ‘यूएनएससी’त स्थायी सदस्यत्व मिळविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले का,’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुरलीधरन म्हणाले, ‘विस्तारीत ‘यूएनएससी’मध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्व घडामोडींत भारत सक्रिय आहे आणि समविचारी देशांसोबत याबाबत कार्यरत आहे.’

Exit mobile version