Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हर्षोल्हासात वणीगडासाठी भाविक पदयात्रेला रवाना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील वणीगड येथे पदयात्रा भाविकांच्या मोठ्या उत्साहामध्ये निघाली आहे. मंगळवारी २८ मार्च रोजी शहरातून पदयात्रेस जाणाऱ्या भाविकांची मिरवणूक काढून त्यांना पदयात्रेसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षी शेकडो भाविक पदयात्रा करून नाशिक जिल्ह्यातील वणीगड येथे जात असतात.यंदाचे त्यांचे १९ वे वर्ष आहे. मंगळवारी जुने जळगाव परिसरात तरुण कुढापा चौकात सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते पियुष ललित कोल्हे, मुन्ना परदेशी, भैय्या ठाकूर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रथम देवीची महाआरती झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत भाविकांच्या जल्लोषामध्ये ही मिरवणूक निघाली. मिरवणूक रथ चौक, नेताजी सुभाष चौक, टावर चौक, नेहरू चौक, शिवतिर्थ चौक, गणेश कॉलनी चौक अशी निघाली. पुढे भाविक पायी यात्रेला नाशिकच्या दिशेने निघाले.

पदयात्रेत १०० पेक्षा अधिक तरुण सहभागी झालेले आहेत. पदयात्रेसाठी अध्यक्ष हितेश वाणी, उपाध्यक्ष चेतन मराठे, कार्याध्यक्ष शंभू भावसार, सचिव राजेंद्र पाटील, नारायण कोळी, आबा चौधरी, पवन भावसार, संदीप चौधरी, भूषण पाटील, भोजराज बारी, अतुल पाटील, दीपक ठाकूर, संभा पाटील, पंकज भावसार आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Exit mobile version