Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरीविठ्ठल नगरातून दुचाकी लंपास; पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । बनावट चाबीने दुचाकी चोरून नेल्याची घटना शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत हिरालाल कुमावत (वय-३५) रा. मारोती मंदीर परिसर, हरीविठ्ठल नगर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. श्रीकांत हे आश्रम शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहे. त्यांच्या मालकीची मोपेड क्रमांक (एमएच19 डीएल 0918) ही मोपेड शनिवारी २५ जुलै रोजी सायंकाळी घराच्या पोर्चमध्ये पार्किंग केली होती. कुटूंबातील सदस्य घरात असताना आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कुमावत यांना दुचाकीच्या हॉर्नचा आवाज आला. त्यामुळे दरवाजा उघडून खाली पोर्चमध्ये आले असता त्यांना मोपेड दिसली नाही. बनावट चाबीने चोरट्याने वाहन सुरू करून मोपेड घेऊन पसार झाला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version