हरिविठ्ठल नगरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने महिला विषयक कायदाबाबत जनजागृती अभियान कार्यक्रम आज शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात आला.

या कार्यक्रमाला विधीतज्ञ श्रध्दा काबरा, महिला समुपदेशक भारती मस्के, प्रा. डॉ. बी. युवाकुमार रेड्डी व प्रा. विजेता सिंग यांनी मार्गदर्शन केले. या शिबीरात महीलावरील होणारे अत्याचार, शासनाच्या वतीने विधवा निराधार, जेष्ट नागरीकांना मिळणाऱ्या विविध योजनांची परिपुर्ण माहिती देवुन जनजागृतीसाठी प्रयत्न करणे, महीलांना बचत गटांच्या माध्यमातुन मिळणारे फायदे, खुन करणे किंवा खुन करण्याचे प्रयत्न करणे या विविध विषयांवर उपस्थितांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या शिबीरात हरीविठ्ठल नगर परिसरातील रमादेवी पाटील, गोरख महाराज, शंभू रोकडे, कैलास मोरे यांच्यासह एस. एस. मणियार लॉ कॉलजचे विद्यार्थी सायली झोपे, कृष्णल चौधरी, सागर पाटील, सुलतान राठोड, चेतना जोशी, जागृती, पाटील, मनीष चौव्हण, दीपक सोनवणे,आणि हरीविठ्ठल नगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतुल उभाळे व आभार प्रदर्शन माईसाहेब पाटील यांनी केले.

Protected Content