Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरिविठ्ठल नगरात एकला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून वाद होवून सहा जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना ११ रोजी घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरातील पांडूरंग बाजीराव कोळी हे सोमवार, ११ रोजी सायंकाळी घराजवळ उभे असतांना त्यावेळी गोलू भोई, समाधान भोई, बंटी महाले, गोविंदा, शैलेश, सागर (पूर्ण नाव माहित नाही, राश्‍ खंडेरावनगर) हे त्याठिकाणी रिक्षाने आले. पांडूरंग व रिक्षातून आलेल्या ६ जणांमध्ये बकरीला कट का मारला? या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच त्या सहा जणांनी पांडूरंग यांना लाथा-बुक्कयांनी मारहाण केली. एकाने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यात ते जखमी झाले. अखेर याप्रकरणी गुरवारी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version