Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरिनाम किर्तन सोहळ्याची खा.सी.आर. पाटील व आ. संगीता पाटील यांच्या उपस्थितीत सांगता

2435b15d 8104 4b7d 87fd b5035cf7f3da

 

रावेर (प्रतिनिधी) जलसंकट व विश्वकल्यानसाठी मागील सहा दिवसांपासून सूरत शहरातील लिंबायत निलगिरीमध्ये सुरु असलेल्या अखंड हरिनाम किर्तन सोहळ्याची सांगता नुकतीच खासदार सी.आर.पाटील व आमदार संगीता पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या सोहळ्याला जळगाव जिल्ह्यातील किर्तनकारांच्या मधूर वाणीमुळे उपस्थित भाविक-भक्त चांगलेच तृप्त झाले होते.

 

सूरत शहरातील लिंबायत निलगिरीमध्ये असलेल्या श्रीनाथ सोसायटीमधील शिव साईबाबा मंदीराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विश्व कल्याण,देशहित व देशाचे जलसंकट दूर होण्यासाठी हा कर्तन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमला हभप प्रशांत महाराज, ईश्वर महाराज, गोकुळ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, प्रतिभाताई पाटील यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. ही सर्व मंडळी जळगाव जिल्ह्यातील असून हा कार्यक्रम दि 26 ते दि 2 जून पर्यंत आयोजत करण्यात आलेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.नरेंद्र पाटील , वैशाली पाटील यांच्यासह लोकमान्य मित्र मंडळ,साईराम मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version