हरताळ्याला श्रावणबाळाचा पौराणिक वारसा

 

 

वरणगाव  : प्रतिनिधी । नॅशनल हायवेच्या बाजूला मुक्ताईनगर तालुक्यात हरताळा गाव लक्ष्मी सागर तलावाच्या किनारी आहे, त्रेता युगामध्ये दशरथ राजाने या तलावाच्या काठी श्रावणबाळाचा वध केला तेव्हापासून आजपर्यंत हा तलाव शेतीसाठी संजीवनी ठरला आहे , असे समजले जाते

 

मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आतापर्यंत खूप कमी पाऊस झाला आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे त्रेतायुगापासून हरताळा येथे लक्ष्मीसागर तलाव आहे हा तलाव काही वर्षांपूर्वी गाळामुळे भरला होता त्यामुळे तलावांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठ्यात नव्हतं प्रशासनाने यातील गाळ काढला या तलावाची खोली आणि रुंदी वाढवली त्यामुळे हा तलाव उन्हाळा , पावसाळा  व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये भरलेला असतो परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीला व बोरवेलला मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत आहे या तलावाच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी भरपूर पाणीसाठा उपलब्ध होत आहे हा तलाव शेतकऱ्यांसाठी जणू संजीवनी ठरत आहे

 

लक्ष्मीसागर तलावाच्याकाठी श्रावणबाळाची समाधी आहे या समाधीलगतच श्रावण बाळाच्या आईवडिलांची समाधी आहे त्याचबरोबर महानुभाव पंथाचे श्रीकृष्णाचे मंदिर आहे वनखात्याचे  याच ठिकाणी गार्डन आहे त्यामुळे हे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे नागरिकांची खूप मोठी वर्दळ या ठिकाणी पाहावयास मिळत आहे

 

Protected Content