Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरताळा येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव, प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

जळगाव येथील उद्योजक श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील हे ही उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.समाजातील घटकातील लोकांनी दातृत्व दाखवत रंजल्या गांजल्यांसाठी व गरजूंसाठी पुढे यायला हवे असे मत श्री.पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ , शिक्षणप्रेमी आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version