Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हम बोले सो कायदा देशात चालू देणार नाही : काँग्रेस

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आज मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

संसदेमध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या घोटाळ्याविषयी जे प्रश्न उपस्थित करणे सुरू केले होते. त्याच्या भीती पोटी राहुल गांधी यांच्या वरती खोटा गुन्हा दाखल करत त्यांची खासदारकी रद्द केली या संपूर्ण प्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अडाणी यांच्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे अनैतिक संबंध आहेत.. ?याबाबतची काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याकरता आज मुक्ताईनगर विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये असलेलं सत्य संबंध जनतेला मोदी साहेबांनी स्पष्ट करावा.
1.उद्योगपती गौतम अदानी याच्याशील कंपनीमध्ये 20000 कोटी रुपये कुठून आले..? या प्रश्नाचे उत्तर संसदेमध्ये राहुल गांधी मोदी साहेबांना विचारणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करत त्यांची खासदारकी रद्द केली. परंतु राहुल गांधी यांचा हाच प्रश्न आता मोठं जनआंदोलन निर्माण करणारा प्रश्न झालेला आहे.राहुल गांधी यांचा आवाज बनत आता काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हाच प्रश्न मोदी साहेबांना प्रत्येक तालुका स्तरावर व प्रत्येक गाव पातळी स्तरावर जाऊन सत्याग्रह आंदोलन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारणार आहे.

हम बोले सो कायदा आता यापुढे या देशांमध्ये चालू देणार नाही काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे.प्रत्येक गावागावांमध्ये आता देशाचं संविधान लोकशाही वाचवण्याकरता जनतेच्या दरबारात जाऊन काँग्रेसचा कार्यकर्ता आंदोलन करणार आहे असा विश्वास असे मत जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.

या पत्रकार परिषदेच्या वेळी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भोईसर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील, भटक्या विमुक्त विभागाचे प्रदेश प्रवक्ते अरविंद गोसावी, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, सेवादल अध्यक्ष सुभाष पाटील नामदेव कांडेलकर, निखिल चौधरी, राजेंद्र जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version