Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हमाल कामगार संघटनेतर्फे मयत सभासदांच्या कुटुंबाला मदत

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | फळे व भाजीपाला हमाल कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते धुडकू सपकाळे यांच्या हस्ते फळे व भाजीपाला मार्केट येथे मयत झालेल्या सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.

 

मयत सभासदांच्या कुटुंबीयांना मदत या उपक्रमांतर्गत फळे व भाजीपाला हमाल कामगार संघटनेच्या वतीने अशोक कोळी, शेख उखान, अरुण सोनवणे या मयत झालेल्या सभासदांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली आहे. मयत झालेल्या आपल्या कष्टकरी हमाल माथाडी कामगार बांधवांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हा उपक्रम महाराष्ट्रभर इतर कामगार संघटनांनी देखील राबवाबा असे आवाहन यावेळी कामगार नेते धुडकू सपकाळे यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजू सपकाळे, शेख इस्माईल शेख अब्दुल रहेमान, रमेश बिऱ्हाडे, जुबेर शेख, नितीन पाटील, लातीब पठाण, संजय बोरसे, त्रम्बक तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.

Exit mobile version